हिंडन : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील हिंडन विमानतळावरून आजपासून पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्व विमानतळांवरील विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. ती आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. हिंडन विमानतळावरून मंगळवारी बंगळुरू, किशनगड, लुधियाना, आदमपूर आणि नांदेडसाठी उड्डाणे सुरू होत आहेत.

याशिवाय, हिंडन विमानतळावरून मुंबईसाठीची विमानसेवा १४ मेपासून सुरू होईल. तसेच, गोवा, कोलकाता, वाराणसी, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, जयपूर सारख्या शहरांसाठीची विमानसेवा १५ मेपासून सुरू केली जाईल. सध्या हिंडन एअरपोर्टवरून एअर इंडिया एक्सप्रेस, फ्लाय बिग आणि स्टार एअर वे द्वारे सेवा पुरवली जाते.