पुणे : प्रतिनिधी
Robot Soldier Pune | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत Humanoid Robot विकसित करत आहेत. हा रोबोट युद्धप्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाइन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकेल.

धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा या Robot सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे सैन्यदलाला मदतच मिळणार असून जवानांचेही रक्षण होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून संशोधन गट या रोबोटवर काम करत आहे. त्याच्या वरच्या आणि खालच्या शरीराचे स्वतंत्र प्रोटोटाईप तयार केले असून, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये काही महत्त्वाच्या बाबींमध्ये टीमने यश मिळवले आहे. (Robot Jawan)
या रोबोटचे सादरीकरण नुकतेच पुण्यातील ‘नॅशनल वर्कशॉप ऑन ऍडव्हान्स्ड लेग्ड रोबोटिक्स’ मध्ये करण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प प्रगत टप्प्यात असून, रोबोटला मानवी आदेश समजून घेणे आणि अंमलात आणणे यात अधिक अचूकता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. (Latest Pune News)
२०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार : डिझाईन टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ किरण अकेला यांनी सांगितले की, संतुलन राखणे, वेगाने डेटा प्रक्रिया करणे आणि ग्राऊंड पातळीवर अचूक कार्य करणे ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. सुरूंग निकामी करणे, बॉम्ब निकामी करण्याचे काम या रोबोटकडून करता येऊ शकते. (Pune Marathi News)