khabarbat

Shendra-Bidkin DMIC

Advertisement

शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड होणार

 

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गानंतर संभाजीनगर-पुणे या ग्रीन फिल्ड रोडला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली. आता समृद्धी महामार्गाला वाढवण पोर्ट कनेक्टिव्हिटी देणारा अ‍ॅक्सेस कंट्रोल रोड तयार करत आहोत, यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील कंटेनर अवघ्या सात ते आठ तासांत वाढवण पोर्टवर पोहोचेल. ऑरिक सिटीच्या शेंद्रा-बिडकीन डीएमआयसी कनेक्टिव्हिटी करण्याचा निर्णय २०१८ मध्येच घेतला होता. मात्र, काही कारणांमुळे हा रोड झाला नसल्याचे समजले. मात्र, आता हा इंडस्ट्रीयल रिंग रोड करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए)चा पहिला औद्योगिक पुरस्कार वितरण समारंभ एमआयटी कॉलेजच्या मंथन हॉल येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अतुल सावे, इंड्युरन्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक अनुराग जैन, नाथ सीड्सचे नंदकुमार कागलीवाल, डॉ. नरेंद्र मैरपाडी, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे, उपाध्यक्ष उत्सव माछर, अथर्वेशराज नंदावत यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले की, देशातील अनेक राज्यांत डीएमआयसी कॉरिडोअर गेला आहे. मात्र, पहिली स्मार्ट सिटी केवळ आपणच छत्रपती संभाजीनगरमध्ये करू शकलो. येथे अस्तित्वात असलेल्या इको सिस्टीम नेटवर्क, ऑटो क्लस्टरमुळे हे शक्य झाले. टोयोटा, जेएसडब्ल्यू, अथरमुळे छत्रपती संभाजीनगर ईव्ही कॅपिटल बनले आहे. यापुढे जमिनीची मागणी वाढणार असल्याचे लक्षात घेऊन ८ हजार एकर जमीन संपादित करण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रीयल रिंग रोड लवकरच करू, अशी घोषणाही त्यांनी केली. शेंद्रा डीएमआयसीमध्ये एक्झिबिशन-कम-कन्व्हेंशन सेंटर उभारण्यासाठी अनुभवी संस्थेची मदत घेण्याची सूचना त्यांनी उद्योजकांना केली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »
06:38