लॉस एंजिल्स : News Network
अमेरिकेच्या लॉस एंजिल्सच्या हॉलीवूड पॅलेडीयममध्ये जगातल्या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुषांमध्ये घटत्या प्रजनन क्षमतेसंदर्भात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही sperm race आयोजित केली आहे. २० सेंटीमीटर्सच्या ट्रॅकवर दोन स्पर्म पेशींना धावताना डिजिटली दाखवले जाणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण केले जाणार असून सा-या जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

हे पण वाचा…. आर्सेनिकची पातळी वाढल्यास भाताद्वारे कर्करोग बळावणार!

येथे दोन खरोखरचे शुक्राणू (स्पर्म) एका २० सेंटीमीटर लांबीच्या मायक्रोस्कोपिक ट्रॅकवर धावणार आहेत. या ट्रॅकला महिलांच्या प्रजनन प्रणालीसारखे विकसित केले आहे. या स्पर्धेचा हेतु मनोरंजनाच्याही पलिकडचा आहे. जगात पुरुषांची प्रजनन क्षमता (फर्टीलीटी रेट) बद्दल जनजागृती करण्याचा उदात्त हेतू यामागे आहे. गेल्या पन्नास वर्षात पुरुषातील स्पर्मच्या संख्येत ५० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे या मोठ्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी या अनोख्या रेसचे आयोजन केलेले आहे.
या रेसला लाईव्ह मायक्रोस्कोप आणि एचडी कॅमे-यांद्वारे रेकॉर्ड केले जाणार आहे आणि सुमारे ४००० प्रेक्षक या रेसला लाईव्ह पाहातील अशी सोय करण्यात आली आहे. या रेसची कॉमेंट्री केली जाईल. डेटा एनालिसीस आणि रिप्ले देखील दाखवला जाईल, त्यामुळे एखाद्या मॅच इव्हेंट सारखा माहोल तयार होईल.