नवी दिल्ली : प्रतिनिधी
अमेरिकेने अनेक देशांवर tariff लागू केले आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्ला, एक्स कंपन्यांचे मालक Elon Musk यांच्याशी फोनवरून संवाद साधला. टेस्लाने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे आवडते ठिकाण म्हणून निवडले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वत: ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली आहे.

त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांनी मस्क यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान ज्या मुद्द्यांवर चर्चा झाली, तेच मुद्दे फोनवर बोलताना पुन्हा चर्चेत आले.
मस्क यांची टेक कंपनी Tesla भारतात प्रवेश मिळवण्यासाठी वेगाने पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर टेस्लाचे अधिकारी लवकरच भारतात येतील. एलन मस्क यांच्या टेस्लाला आयात शुल्कात सूट मिळविण्यासाठी भारत सरकारच्या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. यासोबतच, सरकारी सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाला तर, टेस्लाने उत्पादनासाठी गुजरातसह महाराष्ट्रातील चाकण आणि छत्रपती संभाजीनगर हे आवडते ठिकाण म्हणून निवडले आहे. एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात ३ ते ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करू शकते, असे देखील मानले जाते.