khabarbat

Thousands of users making UPI payments through apps like Google Pay, PhonePe, and Paytm are once again facing problems.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

UPI Payment | गुगल पे, फोन पे पुन्हा ठप्प; UPI पेमेंट सतत फेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारख्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून UPI पेमेंट करणा-या हजारो युजर्सना पुन्हा एकदा समस्या येत आहेत. शनिवारी अनेकजण यूपीआय पेमेंट करू शकत नसल्याची तक्रार करत आहेत.

डाऊनडिटेक्टर या वेबसाईटवर दुपारी एक वाजेपर्यंत २२०० हून अधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. ब-याच लोकांनी पेमेंट फेल झाल्याची माहिती दिली. मोठ्या संख्येने लोकांना fund transfer करता येत नसल्याची तक्रार करण्यात आली. खरेदीदरम्यान पेमेंट फेल झाल्याने कैक users त्रस्त झाले. NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने UPI पेमेंट ठप्प झाल्याबाबत कोणतंही ठोस उत्तर दिलेलं नाही. नेहमीप्रमाणे तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचं कारण देण्यात आलं. महिन्याभरात तिस-यांदा यूपीआय पेमेंट करताना समस्या निर्माण झाली आहे.

NPCI ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात एनपीसीआयला सध्या अधूनमधून तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे यूपीआय व्यवहार अंशत: डिक्लाईन होत असल्याचं म्हटलं. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत, असंही त्यांनी नमूद केलं.

UPI डाऊन होण्याची समस्या अलीकडच्या काळात अनेकदा समोर आली आहे. गेल्या दोन आठवड्यांत जवळपास ३ वेळा असं घडलं आहे, ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. आजकाल लोक पेमेंटसाठी यूपीआयचा सर्वाधिक वापर करतात. बहुतेक लोक आपल्यासोबत रोख रक्कम नेत नाहीत. त्यामुळे अनेकदा अशी तांत्रिक अडचण आल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याआधीही UPI डाऊन झाल्याची समस्या निर्माण झाली होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »