नाशिक : प्रतिनिधी
नाशिक आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोव्हेंबर २०२४ मध्ये आर्टिलरी सेंटरच्या अधिका-यांची आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या संशयातून चौकशी केली होती. भ्रष्टाचारासह लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सीबीआयचे विभागीय पथक नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी तपासातून सीबीआयच्या ‘एसीबी’च्या हाती महत्त्वाचे पुरावे मिळाल्याची चर्चा रंगली होती.
हे पण वाचा…. ‘Trade war’ मुळे TV, फ्रिज, Mobile, इलेक्ट्रॉनिक वस्तू भारतात स्वस्त होणार!
आता नाशिकच्या आर्टिलरी सेंटरच्या १५ अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जवानांचे बिल पास करण्यासाठी पैशांची मागणी करणा-या ऑडीटर, अकाऊंट, क्लार्क अशा १५ अधिका-यांवर वेगवेगळ्या ११ प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा…. राज्यातील शालेय शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार : भुसे
दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील देवरी शिरपूर येथील आरटीओ चेक पोस्टवर कार्यरत असलेले इन्स्पेक्टर योगेश खैरनाग यांना नाशिक येथील अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. योगेश खैरनाग हे वाहनधारकांकडून अवैधरित्या पैसे उकळत असल्याची माहिती अँटी करप्शन विभागाकडे आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत, अँटी करप्शनच्या अधिका-यांनी योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानुसार अचूक वेळ साधत ही कारवाई करण्यात आली आणि योगेश खैरनाग यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. इन्स्पेक्टर योगेश खैरनाग यांनी नेमकी किती लाच घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.