न्यूयॉर्क : News Network
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक हेलिकॉप्टर कोसळले आणि थेट हडसन नदीत पडले. या घटनेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. हेलिकॉप्टरचे अवशेष काढण्याचे काम पथके करत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. न्यूयॉर्क पोलिस विभागाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हेलिकॉप्टर अपघातामुळे वेस्ट साइड हायवे आणि हडसन नदीतील स्प्रिंग स्ट्रीटच्या आसपासच्या भागात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा…. राज्यातील शालेय शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्यात येणार : भुसे
हेलिकॉप्टरमध्ये एक स्पॅनिश कुटुंब होते, ज्यामध्ये आई-वडील, तीन मुले आणि एक पायलट होता. फ्लाइट रडारच्या आलेखांवरून असे दिसून आले की विमान क्रॅश होण्यापूर्वी सुमारे १५ मिनिटे हवेत होते, त्या दरम्यान ते अनेक वेळा प्रचंड वा-यामुळे हलत होते आणि नंतर हडसन नदीत पडले.
अपघाताचे कारण तपासले जात असल्याचे पोलिस आयुक्त टिश यांनी सांगितले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार दुपारी हेलिकॉप्टरने उड्डाण केले आणि हडसन नदीवरून उत्तरेकडे जाण्याऐवजी दक्षिणेकडे गेले. नंतर न्यू जर्सीच्या किना-यावर दक्षिणेकडे परतले, जिथे ते कोसळले. कमिशनर टिश म्हणाले की, बहुतेक प्रवाशांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. मॅनहॅटन ओलांडून हडसन नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या जर्सी सिटीमधील आपत्कालीन व्यवस्थापन कार्यालयाने अपघाताची चौकशी सुरू केली आहे.