khabarbat

A slab (ceiling) suddenly collapsed while a live concert was going on in a nightclub. As many as 80 people have died in this accident. At least 170 people have been injured.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Santo Domingo | नाईट क्लबचा स्लॅब कोसळला; ८० ठार, १७० लोक जखमी

सँटो डोमिंगो : News Network
डोमिनिकन रिपब्लिकची राजधानी असलेल्या सँटो डोमिंगो येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास एक भयावह दुर्घटना घडली. येथे एका नाईट क्लबमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असतानाच अचानकपणे स्लॅब (छत) कोसळले. या दुर्घटनेत तब्बल ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान १७० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध नाईट क्लब ‘जेट सेट’ मध्ये ही दुर्घटना घडली. ‘जेट सेट’ नाईट क्लब हे सँट डोमिंगोतील एक प्रमुख सांस्कृतिक स्थळ मानले जाते. यावेळी अनेक हाय-प्रोफाइल लोक उपस्थित होते. यात राजकारणी, खेळाडू आणि संगीत प्रेमींचा समावेश होता. क्लबचे छत कोसळल्याने अनेक जण त्याखाली दबले गेले.

या दुर्घटनेनंतर, तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू झाले. ढिगा-याखाली अडकलेल्यांना वाचवण्यात आले. दरम्यान, आम्हाला विश्वास आहे की, त्यांपैकी अनेक लोक अद्यापही जिवंत आहेत आणि ढिगा-याखालील शेवटची व्यक्ती जोवर बाहेर येणार नाही, तोवर येथील स्थानिक सरकार हार मानणार नाही, असे आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे संचालक जुआन मॅन्युएल मेंडेझ यांनी म्हटले. महत्वाचे म्हणजे घटनेच्या १२ तासांनंतरही परिस्थिती गंभीर होती. अग्निशमन दलाचे जवान लोकांना ढिगा-याखालून काढण्यासाठी लाकडी फळ्या आणि ड्रिलचा वापर करत होते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »