टेक्सास : News Network
१२,५०० वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या पांढ-या (Dire Wolf) लांडग्यांना अनुवांशिकरित्या परत आणण्यात यश आलं आहे. शास्त्रज्ञांनी अनुवांशिक अभियांत्रिकीद्वारे डायर वुल्फ प्रजातीचे पुनरुज्जीवन केले आहे.

१०,००० वर्षांत पहिल्यांदाच आता Dire Wolf ची गर्जना ऐकता येणार आहे. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर २०२४ रोजी झाला. त्यांची नावे रोम्युलस, रेमस आणि खलिसी आहेत. ते फक्त तीन ते सहा महिन्यांचे आहेत, पण त्यांची उंची जवळजवळ चार फूट आहे आणि वजन ३६ किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे.

नामशेष झालेल्या प्रजातींचे पुनरुज्जीवन टेक्सासमधल्या कोलोसल बायोसायन्सेस कंपनीने केले आहे. प्राचीन डीएनए, क्लोनिंग आणि जीन एडिटिंग वापरून लांडग्यांची पिल्ले तयार केल्याचे कोलोसल बायोसायन्सेसने म्हटलं. संशोधकांनी ओहायोमध्ये उत्खनन केलेल्या १३,००० वर्ष जुन्या भयानक लांडग्याच्या दाताचा आणि आयडाहोमध्ये सापडलेल्या ७२,००० वर्ष जुन्या कवटीच्या तुकड्याचा अभ्यास केला, जे दोन्ही संग्रहालयात ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर शास्त्रज्ञांनी एका जिवंत राखाडी लांडग्याच्या रक्तपेशी घेतल्या आणि २० वेगवेगळ्या ठिकाणी अनुवांशिकरित्या त्यांना सुधारित करण्यासाठी क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्सचा वापर केला.
शास्त्रज्ञांनी ते अनुवांशिक साहित्य एका पाळीव लांडग्याच्या अंड्याच्या पेशीमध्ये सोडले. त्यानंतर गर्भ एका लांडग्याकडे हस्तांतरित करण्यात आला. ६२ दिवसांनंतर, अनुवांशिकरित्या सुधारित तंत्रांनी डायर वुल्फसारखे दिसणारे शावक निर्माण झाले.