khabarbat

The country's 40th c-Doppler radar will be installed on half an acre of land at Mhaismal in Khultabad taluka,Sambhajinagar district.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

म्हैसमाळला उभारणार C-doppler रडार; ४०० किमी रेंजमधील हवामानाची माहिती मिळणार

संभाजीनगर : प्रतिनिधी
देशातील ४० वे सी-डॉप्लर रडार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ येथील अर्धा एकर जागेत बसविण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने यासाठी पूर्वीच मंजुरी दिली होती. गेल्या आठवड्यात रडारसाठी म्हैसमाळ येथे जागा मिळाली. ती जागा इंडियन मेट्रालॉजिकल डिपार्टमेंटला देण्यात आली आहे. साधारणत: मे २०२५ मध्ये याचे काम सुरू होईल.

एक ते दीड वर्षात ते काम पूर्ण झाल्यानंतर रडारच्या सुमारे ४०० किमी रेंजमधील हवामानाची इत्यंभूत माहिती मिळेल. ज्यामुळे येथील शेतकरी, शेती, पशुधन संरक्षण होण्यास मदत होईल. अवकाळी पाऊस, तापमान, दुष्काळ, गारपीट, ढगफुटी, चक्री वादळाची माहिती रडारमुळे मिळू शकेल.

माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि आयएमडीचे संचालक सुनील कांबळे यांनी रडारची तांत्रिक माहिती देताना अर्धा एकर जागा ताब्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिलीकेंद्रीय विज्ञान मंत्रालयाने सी बँड डॉप्लर रडार मंजूर केले आहे. म्हैसमाळ समुद्रसपाटीपासून ऊंच असल्याने तेथे रडार व इतर यंत्रणा असेल. वन विभागाने त्यासाठी जागा दिली आहे. या रडारमुळे मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रापर्यंतच्या हवामानाचे अचूक अनुमान मिळेल. शेतक-यांना हवामान माहितीचा सर्वाधिक फायदा होईल. खुलताबाद-म्हैसमाळ या उंच ठिकाणी रडार बसविण्यासाठी आयएमडीने तयारी केली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »