नवी दिल्ली : khabarbat News Network
इलॉन मस्क यांच्यामुळे सध्या अमेरिकेसह जगभरात खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुस-यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर टेस्ला प्रमुखांकडे DOGE ची धुरा सोपवली. शासनाचा कारभार सुधारणे आणि खर्च कमी करणे, हे या नव्याने स्थापन झालेल्या विभागाचे काम आहे. मात्र, Musk यांनी DOGE उपक्रमांतर्गत उचललेली पावले भारतीय IT कंपन्यांसाठी तणावाचे कारण ठरली आहेत.

भारतीय IT कंपन्यांसाठी हे वर्ष आधीच आव्हानात्मक ठरले आहे आणि आता विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, आर्थिक वर्ष २०२६ मध्ये उद्योगाला अपेक्षित पुनर्प्राप्ती मिळणार नाही. आयटी क्षेत्रातील दिग्गज ऍक्सेंचरच्या ताज्या तिमाही अहवालात मागणीतील कमकुवतपणा आणि विवेकाधीन खर्चात घट अधोरेखित करण्यात आली आहे.
हे पण वाचा…. शस्त्रक्रियेनंतर बोलू लागला फाडफाड इंग्रजी!
भारतीय IT निर्देशांक या वर्षी आतापर्यंत १५.३ टक्क्यांनी घसरला असून जून २०२२ नंतरची ही सर्वात वाईट तिमाही ठरणार आहे. TCS, Wipro, Infosys आणि HCL Tech या प्रमुख आयटी कंपन्यांचे समभाग ११.२ टक्क्यांवरून १८.१ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत.
भारतीय आयटी उद्योगाचे सूचक एक्सेंचरने आपल्या अहवालात म्हटले आहे की, ग्राहक नवीन प्रकल्पांवर खर्च करणे टाळत आहेत आणि त्यांच्या बजेटमध्ये कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.
या मंदीचे एक कारण म्हणून अमेरिकन प्रशासनाची धोरणे सांगितली. आपल्या जागतिक उत्पन्नात फेडरल क्षेत्राचा वाटा सुमारे ८ टक्के आणि अमेरिकेच्या एकूण उत्पन्नात १६ टक्के आहे. नवे सरकार कार्यक्षमता वाढविण्यासाठी सरकारी खर्चात कपात करत असल्याने नव्या प्रकल्पांचा वेग मंदावला आहे.
अहवालानुसार अमेरिकेच्या वाढत्या शुल्कामुळे व्यापार तणाव वाढला आहे, ज्यामुळे अमेरिकन बाजारात मंदीची भीती निर्माण झाली आहे. अमेरिका ही भारतीय आयटी कंपन्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असून तेथील अनिश्चिततेचा थेट परिणाम भारताच्या आयटी क्षेत्रावर होत आहे.