khabarbat

Many districts in Maharashtra have been warned of heavy rain for the next two days. There is a possibility of rain in Vidarbha. Yellow alert has been issued for some districts in Vidarbha and orange alert for some districts.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Heavy Rain Alert | राज्यात अवकाळीसह गारपीट; विदर्भातील ९ जिल्ह्यांना दिला ‘अलर्ट’

पुणे : khabarbat News Network
देशात पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वा-यासह जोरदार पावसाची चिन्हे असून आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार ५० ते ६० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आयएमडीने दिलेल्या इशा-यानुसार पुढील दोन दिवस पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हे पण वाचा…. शस्त्रक्रियेनंतर बोलू लागला फाडफाड इंग्रजी!

झारखंडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भात अलर्ट
अमरावती, वाशिम, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट, तसेच यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सध्या नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »