मुंबई : News Network
IT आणि Telecom कंपन्यांच्या शेअर्समुळे आज शेअर बाजारावर मोठा दबाव दिसून आला. Index २.२८ टक्क्यांनी घसरला. टाटा कम्युनिकेशन्स वगळता या निर्देशांकात समाविष्ट असलेले सर्व शेअर्स Red Zone मध्ये आहेत. निफ्टीतील टॉप लूजर्सच्या यादीत विप्रो ५ टक्क्यांनी घसरून २६३.१५ रुपयांवर आला आहे. Infosys चे शेअर्स ४.७८ टक्के आणि HCL Tech चे समभाग ३.६३ टक्क्यांनी घसरले. तर दुसरीकडे TCS २.२३ टक्क्यांनी घसरला.

निफ्टी IT निर्देशांकात मोठी घसरण दिसून येत आहे. त्यात ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यात सामील असलेले सर्व १० शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. टेक महिंद्रा २.२९ टक्क्यांनी घसरला. LTIM मध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
Oracle २.४९ टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे कोफोर्जचे शेअर २.१४ टक्क्यांनी घसरले. सायंट, टाटा एलेक्सी, बेसॉफ्ट, तेजस नेटवर्क आणि TATA Tech या कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये आहेत. दुसरीकडे आयडिया ३.८१ टक्के आणि इंडसटॉवर ३.२२ टक्क्यांनी घसरला. पर्सिस्टंस २.८३ टक्क्यांनी घसरला. LTTS मध्ये २.८१ टक्क्यांची घसरण दिसून आली. एमफॅसिसमध्ये २.७७ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. KPIT Tech मध्येही सुमारे अडीच टक्क्यांची घसरण झाली.