बॅँकॉक : News Network
venomous snake in an ice cream | पॅकिंग फूडचे फॅड सा-या जगभर पसरले आहे. सध्या पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये अनेक चित्र-विचित्र वस्तू, पदार्थ सापडत आहेत. ‘फाड रॅपर की, लाव तोंडी’ असे लहानांपासून थोरांपर्यंत यथेच्छ सुरू आहे. मात्र याच घाईमुळे अनेकविध आजारांना आमंत्रण मिळते आहे.

भलेही आपल्या आसपास ही घटना घडलेली नसेल पण हे खरे आहे की, एका आईस्क्रिममध्ये चक्क एक छोटा विषारी साप आढळला. एका चॉकलेट बार आईस्क्रिममध्ये गोठलेल्या अवस्थेत हा साप होता. थायलंडमधील रॅचबुरी विभागात ही खळबळजनक घटना घडली. रेबॅन नॅकलेंबुन असे या फेसबुक युजर्सचे नाव आहे. ‘हे तुझे डोळे किती क्यूट दिसतात. तु असा कसा मेलास? काळ्या बीन्ससारखा, पण हा फोटो खरा आहे कारण मी हे खरेदी केले आहे’ अशी पोस्ट रेबॅन याने फोटोसोबत लिहीली आहे.
या व्यक्तिने एक ‘ब्लॅक बीन्स आईस्क्रिम बार’ खरेदी केला होता. रॅपर उघडल्यावर त्याला धक्काच बसला (Icecream) आईस्क्रिम बारमध्ये ब्लॅक बिन्सबरोबर चक्क छोटा साप दिसला. त्याने या बारचे फोटो काढून तो फेसबूकवर शेअर केला व पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. आईस्क्रिमचे रॅपर उघडल्यावर छोटा साप बारच्या टोकावर रुतून बसला होता त्याचे डोळे थोडेसे बाहेर आले होते. त्याने तो बार फेकून न देता त्याचे फोटो काढले व सोशल मिडीयावर मित्रांना टाकत हा अतिशय धक्कादायक अनुभव शेअर केला.
आढळलेला साप हा विषारी
आईस्क्रिमध्ये आढळलेला साप हा विषारी होता. काळे – पिवळे पट्टे असलेला हा साप आईस्क्रिममध्ये दबला होता. ‘गोल्डन ट्री’ स्नेक या प्रजातीचा हा विषारी साप असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. अशाच प्रकारची घटना २०२४ मध्येही समोर आली होती. मुंबईतही एका ऑनलाईन मागवलेल्या केकमध्ये माणसाच्या हाताचे बोट आढळल्याने खळबळ उडाली होती.