khabarbat

NASA astronauts Sunita Williams and Butch Wilmore will soon return to Earth. NASA will bring the two back to Earth on March 19, 2025.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

सुनीता विल्यम्स, बुच १९ मार्च रोजी पृथ्वीवर परतणार! Space X च्या मोहीमेत बदल

 

वॉशिंग्टन : News Network
गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले NASAचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. येत्या १९ मार्च २०२५ रोजी नासा या दोघांना पृथ्वीवर आणणार आहे. इलॉन मस्कची कंपनी  SpaceX या मिशनमध्ये मदत करत आहे. दरम्यान, अंतराळातून परतण्याबाबत सुनिता यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.

आम्ही अंतराळात घालवलेल्या वेळेचा आनंद लुटला. आमच्यासाठी हे फक्त एक मिशन होते, पण आमच्या कुटुंबांसाठी आणि समर्थकांसाठी रोलरकोस्टर राईड होती. सर्वात कठीण भाग म्हणजे, आम्ही परत कधी येऊ, हे देखील आम्हाला माहित नव्हते. आम्ही रोज ठराविक कामे करुन प्रत्येक दिवस मनोरंजक बनवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्या म्हणाल्या.

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीला केवळ एक आठवड्यासाठी अंतराळात गेले होते, परंतु बोईंग Starliner मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली, ज्यामुळे यानाला या दोघांशिवाय पृथ्वीवर परतावे लागले. अनेक प्रयत्न करुनही दोघांना पृथ्वीवर परत आणणे शक्य झाले नाही. अखेर इलॉन मस्कची कंपनी SpaceX नासाच्या मदतीसाठी पुढे आली. या महिन्यातच सुनिता आणि बुच परतणार आहेत.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

ताज्या बातम्या

Translate »