नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘बंजारा कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
