वॉशिंग्टन : News Network
पुढच्या महिन्यात एक अद्भूत घटना घडणार आहे. मार्च महिन्यात अशी घटना घडणार आहे की, ज्याची खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षापासून वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यात पूर्ण चंद्र ग्रहण लागणार आहे. पूर्ण चंद्र ग्रहणाला blood moon म्हटले जाते. २०२२ नंतर आता हे अद्भूत दृश्य पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी पूर्ण चंद्र ग्रहण ८ नोव्हेंबर २०२२ रोजी लागले होते. हा Blood Moon जगातील काही देशात दिसला होता. संपूर्ण रक्तासारखा लाल चंद्र दिसला होता.

यंदाच्या वर्षातील पहिले चंद्र ग्रहण १४ मार्च रोजी फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला लागणार आहे. हे पूर्ण चंद्र ग्रहण असेल. पण भारतात हे चंद्र ग्रहण किंवा blood moon दिसणार नाही. पूर्ण चंद्र ग्रहण जवळपास ६५ मिनिटे लागेल. ग्रहणाच्या वेळी चंद्राचा सफेद रंग बदलून फिक्कट किंवा भूरकट लाल रंग होईल. चंद्र ग्रहण रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल. आणि पहाटे ६ वाजता संपेल.
‘ब्लड मून’ हा शब्द पूर्ण चंद्र ग्रहणासाठी वापरला जातो. जेव्हा पृथ्वीची संपूर्ण सावली चंद्रावर पडते तेव्हा पूर्ण चंद्र ग्रहण होते. जेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या वायु मंडळातून जातो, तेव्हा त्यातून निळा आणि हिरवा प्रकाश येतो. तसेच लाल आणि नारंगी प्रकाश चंद्रावर पडतो. त्यामुळे चंद्र लाल किंवा फिक्कट लाल रंगात दिसतो. त्यालाच blood moon म्हटले जाते.
यावेळी ब्लड मून दक्षिण अमेरिका, कॅनडा, मॅक्सिको, ब्राझिल आणि चिली, यूरोप आणि आफ्रिकेतील काही भागात आंशिक दिसणार आहे. उघड्या आकाशात लाल चंद्र स्पष्टपणे दिसेल. ज्या ठिकाणी ब्लड मून दिसणार नाही, त्या देशातील लोक ऑनलाईन लाइव्ह पाहू शकतात.
अमेरिकेत १३ मार्चला दिसणार Blood Moon
उत्तर अमेरिकेत चंद्र ग्रहण १३ मार्च रोजी दिसेल. पूर्व क्षेत्रात आंशिक ग्रहण रात्री १ वाजून ९ मिनिटांनी आणि पूर्ण ग्रहणाचा अवधी २ वाजून २६ मिनिटांपासून ३ वाजून ३२ मिनिटापर्यंत राहील. पश्चिम क्षेत्रात चंद्रग्रहणाबाबत सांगायचं तर आंशिक ग्रहण रात्री १० वाजून ९ मिनिट आणि पूर्ण ग्रहण ११ वाजून २६ मिनिटापासून १२ वाजून ३२ मिनिटापर्यंत असेल.