गया : News Network
10th Exam | बिहारमधील गया जिल्ह्यात परीक्षा सुरू झाली आहे. त्यापैकी एका केंद्रावर अजब घटना समोर आली. ५००० मुलींमध्ये बसून एकटाच मुलगा परीक्षा देत आहे. रॉकी असे या मुलाचे नाव असून तो म्हणाला की, त्याला यामुळे खूप अस्वस्थ वाटत होतं. परंतु वर्ष वाचवण्यासाठी अशा परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली.

शेरघाटीचं एसएमजीएस कॉलेज हे मुलींसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले, परंतु तांत्रिक बिघाडामुळे रॉकीच्या हॉल तिकिटवर ‘महिला’ असे नोंदवण्यात आले. या कारणास्तव त्याला या परीक्षा केंद्रावर पाठवण्यात आले. जिल्हा शिक्षण अधिका-यांनी ही एक सामान्य चूक असल्याचे म्हटले आणि ती नंतर दुरुस्त करता येईल असे सांगितले.
मॅट्रिकच्या परीक्षेसाठी अर्ज करणा-या रॉकी कुमारच्या हॉल तिकिटवर चुकून त्याचे लिंग ‘महिला’ असे नोंदवण्यात आले होते. सहसा, मुलांसाठी परीक्षा केंद्र गया शहरात आणि मुलींसाठी शेरघाटी येथे असते. परंतु या चुकीमुळे, रॉकीला ५००० मुलींमध्ये परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात आले.