khabarbat

The system of Lease Agreement 2.0 is being launched on a pilot basis in Pune district from February 17. This lease agreement is now available in Marathi.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

House Rent Agreement | येत्या सोमवारपासून आता भाडे करार चक्क मराठीतून

पुणे : प्रतिनिधी
ऑनलाइन भाडेकरार आता राज्यभरातून कुठूनही नोंदविता येणार असून, त्यासाठी भाडेकरार २.० ही प्रणाली प्रायोगिक तत्त्वावर पुणे जिल्ह्यात १७ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. हा भाडेकरार आता मराठीतून उपलब्ध करून देण्यात आला असून, पक्षकारांची माहिती आधार क्रमांकाद्वारे थेट आधार पोर्टलवरूनच घेण्यात येणार असल्याने फसवणुकीचे प्रकार टळणार आहेत. येत्या पंधरवड्यात ही प्रणाली सबंध राज्यभर लागू करण्यात येणार आहे.

ऑनलाइन भाडेकरारासाठी ‘भाडेकरार १.९’ ही संगणक प्रणाली वापरली जात आहे. गेल्या वर्षभरात राज्यात १३ लाख १० हजारांहून अधिक जास्त भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आले आहेत. पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर या विभागात भाडेकरारांची विक्रमी दस्त नोंदणी होत असते. त्यामुळे या प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी तसेच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी २.० ही अद्ययावत संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक (माहिती तंत्रज्ञान) अभयसिंह मोहिते यांनी दिली.

या प्रणालीत भाडेकरार आता मराठीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच भाडेकरारासाठीचे शुल्क भरण्यासाठी याच पोर्टलवरून क्युआर कोडचा वापर करून ‘पे टू आयजीआर’ या प्रणालीचा वापर करता येणार आहे. पक्षकारांचे आधार क्रमांक यात टाकल्यानंतर त्यांची सबंध माहिती आधार पोर्टलवरूनच मिळविली जाणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »