khabarbat

While investigating the Rs 26.92 crore scam, a fake GST invoice racket worth Rs 140 crore was also exposed.

Advertisement

GST fraud | २६ कोटीचा जीएसटी घोटाळा; आढळली १४० कोटीची चोरी

मुंबई/पुणे : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणात अधिका-यांनी २६.९२ कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याशी संबंधित जीएसटी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या रॅकेटच्या मास्टरमाइंडला अटक करण्यात आली आहे. मात्र या कारवाईमधून मोठी माहिती समोर आली. २६.९२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास करताना १४० कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी इनव्हॉइस रॅकेटचाही पर्दाफाश झाला.

बनावट जीएसटी देयकांच्या आधारे १४० कोटी रुपयांची करचोरी झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात मीरा रोड येथून एका व्यक्तीला अटक करण्यात आली. कपाडिया मोहम्मद सुल्तान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सीजीएसटी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपाडिया मोहम्मद सुल्तानने जीएसटी न भरता बनावट इनव्हॉइस तयार करण्यासाठी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते. कपाडियाने १८ बनावट कंपन्यांच्या नावाने देयके इनव्हॉइस करुन जीएसटीचा परतावा घेतला. या बनावट परताव्यांमधून त्याने १४० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

कपाडियाने रॉयल एंटरप्राइज, सरस्वती एंटरप्राइजेस, लुकास इन्फ्राट्रेड एलएलपी आणि मारुती ट्रेडिंग यासारख्या कंपन्या केवळ सरकारची फसवणूक करण्यासाठी स्थापन केल्या होत्या. कपाडियाला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या पुणे विभागीय शाखेने १,१९६ कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा उघडकीस आणला. अधिका-यांनी पुणे, दिल्ली, नोएडा आणि मुझफ्फरनगरमधील विविध ठिकाणी छापे टाकून केलेल्या तपासात बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) व्यवहारांमध्ये सहभागी बोगस कंपन्यांचे एक रॅकेट समोर आणले.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »
20:43