हैदराबाद : khabarbat News Network
आंध्र प्रदेशमधील महिला कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला दिनापूर्वीच राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी महिलांसाठी work from home ची घोषणा केली आहे. या निर्णयाची राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. या घोषणेबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की, या निर्णयामुळे कामाच्या ठिकाणी महिलांची उत्पादकता आणखी सुधारेल. Covid-19 साथीच्या काळात काम करण्याच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला आहे. तंत्रज्ञानामुळे घरून काम करणे सोपे झाले. Remote work, Co working space आणि neighbourhood work space यासारख्या व्यवस्था व्यवसाय आणि काम करणा-या लोकांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत, यामुळे कामाची उत्पादकता देखील वाढेल, असेही मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पोस्टमध्ये लिहिले की, अशा उपक्रमांमुळे आपल्याला काम आणि जीवनातील संतुलन चांगले राहण्यास मदत होऊ शकते. आंध्र प्रदेशात अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याची आमची योजना आहे. आंध्र प्रदेश आयटी आणि जीसीसी धोरण ४.० हे त्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.