khabarbat

Sunita Williams Could reture in another 720 hours.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Sunita Williams | सुनिता विल्यम्सची ३० दिवसांनी होणार घरवापसी!

सॅनफ्रान्सिस्को : News Network
Sunita Williams | NASA या अंतराळ संस्थेनुसार, Space X आगामी अंतराळ मोहिमांसाठी कॅप्सूलच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. अवकाशात अडकलेल्या बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना मार्चच्या मध्यावर पृथ्वीवर परत आणता यावे, यासाठी हा बदल केला जाणार आहे. या निर्णयामुळे दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश तळावरील थांबण्याचा कालावधी दोन आठवड्याने कमी होणार आहे. मागच्या आठवड्यात बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आठ महिने पूर्ण झाले. सुनीता विलियम्स या ५ जून २०२४ रोजी NASA च्या मिशनवर गेल्या होत्या.

नासाच्या वाणिज्यिक चालक दल प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव स्टिच यांनी सांगितले की, ‘मानवी अंतराळ मोहिम अनेक आव्हानांनी भरलेली असते विल्मोर आणि सुनीता विलियम्स दोघेही उड्डाणानंतर एक आठवड्याने बोइंगच्या Star liner कॅप्सूलने पृथ्वीवर परतले पाहिजे होते. पण स्टारलायनरच्या कॅप्सूलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे नासाने रिकाम्या कॅप्सूलला पृथ्वीवर परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स या दोघांना पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी Space X वर सोपवली.

Space X ने एका नव्या कॅप्सूलने दोघांना पृथ्वीवर परत आणण्याच ठरवलं. पण या मिशनच्या लॉन्चिंगला विलंब झाला. त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स यांचा अवकाश स्थानकातील कालावधी वाढला. आणखी ७२० तासांनी विल्मोर आणि विलियम्स यांची घर वापसी होऊ शकते. NASA ने आता नव्या कॅप्सूलची प्रतिक्षा करण्याऐवजी नव्या मिशनच्या लॉन्चसाठी जुन्या कॅप्सूलचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ मार्च पर्यंत मिशन लॉन्च करण्याचा उद्देश आहे. जुनी कॅप्सूल एका खासगी मिशनसाठी देण्यात येणार होती. यामध्ये पोलंड, हंगेरी आणि भारताचे अंतराळवीर होते. या मिशनचे वेळापत्रक बदलून पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे विल्मोर आणि विलियम्स या दोघांची लवकर घरवापसी होऊ शकते.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »