नवी दिल्ली : khabarbat News Network
Loan defaulter | तोंडी कराराच्या आधारे पत्नीच्या ट्रेडिंग खात्यातील डेबिट बॅलन्ससाठी पतीला संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे जबाबदार धरता येते असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. म्हणजेच जर पत्नीने शेअर (share market) मार्केटमध्ये कर्ज घेतले असेल तर त्याला पतीही जबाबदार असणार आहे, असे सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे.

सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात सुनावणी करताना म्हटले की, पती-पत्नीमध्ये तोंडी करार झाल्यास कर्ज फेडण्याची जबाबदारी पतीवर येऊ शकते. एका जोडप्याने शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. मात्र कर्ज (Loan) वाढल्याने हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. त्यानंतर (supreme court) सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती पीएस नरसिंग आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.
पत्नीला शेअर मार्केटच्या खात्यात मोठे नुकसान झाले आणि कर्ज वाढले. जेव्हा हे प्रकरण लवाद न्यायाधिकरणात पोहोचले तेव्हा त्यांनी पती-पत्नी दोघांनाही कर्जदार ठरवले. या निर्णयाविरोधात पतीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मात्र तेथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. तोंडी कराराच्या आधारेही पत्नीच्या शेअर बाजाराच्या कर्जासाठी पतीला जबाबदार धरले जाऊ शकते, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.(Bombay Stock Exchange) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या १९४७ च्या कायद्याचा हवाला देत कोर्टाने लवाद न्यायाधिकरण पतीवर आर्थिक दायित्व लादू शकते असे म्हटले.
अपीलकर्ता स्टॉक ब्रोकरकडे पत्नी आणि पतीची स्वतंत्र ट्रेडिंग खाती होती. पण ते संयुक्तपणे ही खाती चालवत होते. पत्नीचे झालेले नुकसान पतीच्या खात्यातून भरून काढण्यात आले. मात्र बाजारात घसरण झाल्यानंतर त्याच्या डेबिट बॅलन्समध्ये लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे (stock broker) स्टॉक ब्रोकरने कर्जासाठी दोघांना जबाबदार धरले आणि लवाद न्यायाधिकरणाकडे जात वसुलीची मागणी केली.