जोहान्सबर्ग : News Network
MI Cep – Sunrisers Eastern | दक्षिण आफ्रिकेतील टी-२० (T 20) लीग २०२५ च्या तिस-या हंगामात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघाने फायनल बाजी मारत पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. केपटाउनच्या संघासमोर (Kavya Maran) काव्या मारनच्या दोन वेळच्या चॅम्पियन संघाचा ‘सूर्यास्त’ झाल्याचा सीन पाहायला मिळाला. पहिल्या दोन हंगामात जेतेपद पटकवल्यानंतर काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स ईस्टर्न संघाला जेतेपदाची हॅटट्रिक साधण्याची संधी होती. पण मुंबई फ्रँचायझीसमोर त्यांचा हा डाव फसला. फायनलमध्ये मुंबई इंडियन्स (MI Cep) केप टाउन संघाने सनरायझर्स ईस्टर्न संघाला ७६ धावांनी मात देत पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

फायनल लढतीत मुंबई इंडियन्स केपटाउन संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना सनरायझर्सच्या (Sunrisers Eastern) संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १० धावांत संघाने दोन विकेट्स गमावल्या. मुंबई फ्रँचायझी संघाकडून कगिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट या गोलंदाजांनी भेदक मारा करत सनरायझर्स संघाला १८.४ षटकात १०५ धावांत आटोपलं. (T20 marathi news)
हे पण वाचा… ‘आप’च्या पराभवाची पाच कारणे….
टी-२० लीगमधील फायनल लढतीत मुंबई इंडियन्सच्या संघाने बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात धमाकेदार कामगिरी केली. पहिल्यांदा बॅटिंग करताना मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील डेवाल्ड ब्रेविस याने १८ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय कॉनर एस्टरहुइजन याने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सलामीला तुफान फटकेबाजी करताना विकेटकिपर बॅटर रिकेल्टन याने १५ चेंडूत ३३ धावा कुटल्या. मुंबई इंडियन्स केपटाउन संघाने अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स केपटाउन संघाने सनरायझर्स संघासमोर १८२ धावांचे टार्गेट ठेवले होते. (T20 Cricket)
दोन वेळचा चॅम्पियन संघ हे आव्हान सहज पार करेल, असे वाटत होते. पण, मुंबई इंडियन्स केपटाउनच्या ताफ्यातील गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर संघ गडबडला, ३.४ षटकात अवघ्या २६ धावांत संघाने ४ विकेट्स गमावल्या. संघाकडून रबाडाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय ट्रेंट बोल्टने आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी १-१ तर कॅप्टन राशिद खान आणि कॉर्बिन बॉस यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.