khabarbat

Ekata Kapoor announced Nagin 7

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Nagin 7 | एकता कपूरला मिळाली नवीन नागीण…

 

टीव्ही क्वीन एकता कपूर (एकता कपूर) आपली यशस्वी फ्रेंचाइजी नागिन घेऊन येत आहे. एकताने ‘नागिन ७’ (ठंँ्रल्ल 7 री१्रं’)ची अधिकृत घोषणा केली आहे. तेव्हापासून मुख्य अभिनेत्रीबद्दल सोशल मीडियावर विविध अंदाज बांधले जात आहेत. नवीन नागीण कोण होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

दरम्यान, ‘उडारियां’ फेम अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरीने एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. त्यानंतर ती नागीण बनणार असल्याच्या अफवांनी जोर धरला. खरंतर प्रियंकाने एक सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये फोनच्या कव्हरवर एक साप आहे.

२ फेब्रुवारीला एकता कपूरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती मीटिंग रूममध्ये बसलेली दिसत होती. तिने व्हिडिओला कॅप्शन दिले की, नागिन ७.

‘नागिन’च्या नायिका
नागिन मालिका २०१५ मध्ये सुरू झाली होती. या शोमध्ये मौनी रॉय मुख्य भूमिकेत होती. ही मालिका प्रचंड गाजली. याच कारणामुळे मौनी रॉय दुस-या सीझनमध्येही नागीण बनली. यानंतर तिस-या सीझनमध्ये सुरभी ज्योती नागीण बनली. निया शर्मा चौथ्या सीझनमध्ये, तर सुरभी चंदना पाचव्या सीझनमध्ये नागीण बनली. तेजस्वी प्रकाश सहाव्या सीझनमध्ये नागीण बनली. तेजस्वीने बिग बॉस १५ जिंकले होते आणि तिला नागिन ६ची ऑफर देखील मिळाली होती.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »