नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटत असल्याचे, बुरखा घालून दुसरेच मतदान करत असल्याचे आरोप केले जात आहेत. मतदान झाल्या झाल्या एक्झिट पोल येणार आहेत. यातच फलोदी सट्टाबाजाराने आपला अंदाज लावत सट्टा लावण्यास सुरुवात केली आहे.


फलौदी सट्टाबाजारात अरविंद केजरीवाल यांच्या (AAP) ‘आप’ला २५ ते २७ जागांवर नुकसान होताना दिसत आहे. ‘आप’ला ३५ ते ३७ जागा दाखविण्यात आल्या आहेत. असे असले तरी ‘आप’ बहुमताचे सरकार बनविताना या आकड्यांद्वारे दिसत आहे.
हे पण वाचा…. देवेंद्र फडणवीसांची रात्री भेट; खडसेंचा परतीचा मार्ग खुला?
दुसरीकडे भाजपाही ३३ ते ३५ जागा मिळविताना दिसत आहे. काँग्रेसच्या वाट्याला अक्षताच येण्याची शक्यता आहे. (BJP) भाजपासाठी ही जोरदार मुसंडी ठरणार आहे. भाजपा गेल्या २६ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. यावेळी (hariyana) हरियाणा आणि महाराष्ट्र (maharashtra) निवडणुकांच्या निकालाच्या आधारावर भाजपाने चांगलाच जोर लावलेला आहे.
बुकींचा अंदाज दोनवेळा बदलला…
दिल्ली विधानसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतर, बुकींनी सत्ताधारी आम आदमी पक्षाला ३७ ते ३९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. भाजपला २५ ते ३५ जागा मिळतील असे सांगितले होते. यानंतर बुकींचा अंदाज बदलला. सट्टा बाजारात (AAP) ‘आप’च्या जागा ३८ वरून ४० पर्यंत वाढविण्यात आल्या होत्या. तर भाजपाच्या जागांचा आकडा २९ ते ३१ पर्यंत कमी करण्यात आला होता.
कोणत्या सरकारला किती किंमत…
२५ जानेवारीला उघडलेल्या बाजारात भाजपाच्या सत्तास्थापनेचा भाव १.५० रुपये होता. आपचे पुन्हा सरकार येण्यावर बुकींनी ७० ते ८० पैसे किंमत ठेवली होती.