Most expensive Nellore cow | ब्राझीलमध्ये नुकतीच एका गायीची विक्री झाली आहे. महत्वाचे म्हणजे, ही गाय जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. या पांढ-याशुभ्र रंगाच्या सुंदर गायीची प्रजाती प्रामुख्याने भारतात आढळते. ब्राझीलमधील मिनास जेरायज या राज्यात नेल्लोर प्रजातीच्या एका गायीला नुकताच जगातील सर्वात महागड्या गायीचा दर्जा मिळाला आहे. ही गाय एकूण ३१ कोटी रुपयांमध्ये विकली गेली आहे.

नेल्लोर प्रजातीच्या गायीचे वजन १,१०१ एवढे आहे. जे याच प्रजातीच्या इतर गायींच्या तुलनेत साधारणपणे दुप्पट आहे. ही गाय दिसायलाही अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे.
नेल्लोर ही प्रजाती मुळची भारतातील आंध्र प्रदेशातील आहे. या प्रजातीची जनावरे अत्यंत मजबूत असतात. ते गर्मी असो अथवा थंडी, कुठल्याही वातावरणात अगदी सहजपणे राहू शकतात. यामुळे यांना जागतिक बाजारातही मोठी मागणी असते.