वॉशिंग्टन डी.सी. : News Network
Trump – Melania air kiss अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात दोघेही ‘एअर किस’ देताना दिसत आहेत. दुस-यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेण्याच्या काही क्षण आधीच ही घटना घडली. खरे तर, जेडी व्हेन्स यांच्या जवळ उभे राहण्यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानियाजवळ प्रेम व्यक्त करण्यासाठी पोहोचले. दोघेही किस करण्यासाठी एकमेकांकडे झुकले. मात्र, ते किस करू शकले नाहीत. कारण, मेलानिया यांची हॅट दोघांत आडवी आली परिणामी ट्रम्प यांना केवळ ‘एअर किस’वर समाधान मानण्याची नामुष्की ओढवली! (Click the link given below and see video)
