नवी दिल्ली : khabarbar News Network
भारतीय रेल्वे प्रामुख्याने प्रवासी तिकीट आणि मालवाहतुकीच्या भाड्यातून पैसे कमवते. यासाठी प्रत्येक ट्रेनची स्वत:ची खासियत असते, जाणून घ्या भारतीय रेल्वेसाठी कोणती ट्रेन ‘धनलक्ष्मी’ ठरली आहे?

कमाईच्या बाबतीत बंगळुरू राजधानी एक्सप्रेस अव्वल आहे. ट्रेन क्रमांक २२६९२ बंगलोर राजधानी एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन ते केएसआर बंगळुरू असा प्रवास करते. २०२२-२३ मध्ये एकूण ५०९५१० लोकांनी या ट्रेनने प्रवास केला. त्यामुळे जवळपास १,७६,०६,६६,३३९ रुपये रेल्वेच्या खात्यात जमा झाले.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आणि राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीशी जोडणारी सियालदेह राजधानी एक्सप्रेस ही रेल्वेची दुसरी सर्वाधिक कमाई करणारी ट्रेन आहे. ट्रेन क्रमांक १२३१४ सियालदेह राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ मध्ये ५,०९,१६४ लोकांना त्याच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवले, ज्यामुळे या ट्रेनची कमाई १, २८,८१,६९,२७४ रुपयांवर पोहोचली.
या यादीत दिब्रुगडची राजधानी तिस-या क्रमांकावर आहे. नवी दिल्ली ते दिब्रुगड दरम्यान धावणा-या या ट्रेनने गेल्या वर्षी ४,७४,६०५ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचवले होते. यामुळे रेल्वेला एकूण १,२६,२९,०९,६९७ रुपयांची कमाई झाली होती.
नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणारी राजधानी एक्सप्रेस सर्वाधिक कमाई करणा-या टॉप ५ ट्रेनच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. ट्रेन क्रमांक १२९५२ मुंबई राजधानी एक्स्प्रेसने २०२२-२३ मध्ये ४,८५,७९४ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले होते, ज्यामुळे रेल्वेच्या खात्यात १,२२,८४,५१,५५४ रुपये आले.
कमाईच्या बाबतीत, दिब्रुगड राजधानी ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात फायदेशीर ट्रेन आहे. या ट्रेनने गेल्या वर्षी ४,२०,२१५ प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवले. या ट्रेनने १,१६,८८,३९,७६९ रुपये कमावले.