नवी दिल्ली : khabarbat News Network
भारतात सध्या ऑटोमोबाईल (Automobile) क्षेत्रात मोठे बदल होऊ घातले आहेत. पर्यावरणपूरक पर्यायांवर संशोधन सुरू आहे. हायड्रोजन, इथेनॉल, ईव्ही वाहनांचा पर्याय समोर येऊ लागला आहे. अशात इलेक्ट्रिक (#EV) वाहनांची संख्या हळूहळू वाढत आहे. पण तरीही काही अडचणी आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारताची पहिली ‘सोलर कार’ बाजारात येणार आहे.

अवघ्या ४५ मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. भारतासारख्या सूर्य देवतेचा आशिर्वाद असलेल्या देशात ही कार गेमचेंजर (game changer) ठरणाार आहे. या कल्पनेला चालना मिळाली तर ‘ईव्ही’ वाहनांचा लवकरच गेम ओव्हर होण्याची शक्यता आहे.

Vayve Mobility ने इलेक्ट्रिक वाहनातच सौर (solar energy) ऊर्जेच्या वाहनाचा पर्याय समोर आणला आहे. नवी दिल्ली येथील भारत मोबिलिटी ग्लोबल (#global expo) एक्स्पोमध्ये ही कार विविध बदलांसह देशासमोर येईल. १७ ते २२ जानेवारी दरम्यान हा एक्स्पो होणार आहे. यापूर्वी ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये ईव्हाने लाखो चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
ही कार एका चार्जिंगमध्ये २५० किमीचा टप्पा पूर्ण करेल. सौर ऊर्जेवर ही कार चार्ज होईल. सुपरफास्ट (super fast charging)चार्जिंग हे या कारचे वैशिष्ट्य आहे. अवघ्या ४५ मिनिटांत ही कार फूल चार्ज होईल. पाच मिनिटांत ही कार ५० किमीने धावेल. या कारचा टॉप स्पीड ७० किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात येत आहे. या कारसाठी प्रति किलोमीटर ०.५ पैसे खर्च अपेक्षित असल्याचा दावा करण्यात येतो. आधुनिक ग्राहकांच्या अपेक्षेवर ही कार खरी उतरेल असा विश्वास वयवे ईव्हाचे सीईओ आणि सहसंस्थापक निलेश बजाज यांनी व्यक्त केला आहे.