वॉशिंग्टन : News Network
अमेरिका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सरकारी कर्मचा-यांना पगार देण्यासाठी तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे सरकारी कार्यालये बंद होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. निधी उभारण्यासाठी गुरुवारी (१९ डिसेंबर) रात्री अमेरिकन संसदेत एक विधेयक मांडण्यात आले, ज्याला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पाठिंबा दिला. मात्र, हे विधेयक संसदेत अपयशी ठरले. या विधेयकाला केवळ डेमोक्रॅटच (Democrat) नव्हे, तर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या काही खासदारांनीही विरोध केला होता. हे विधेयक संसदेत १७४-२३५ च्या फरकाने फेटाळण्यात आले. रिपब्लिकन (Republican) पक्षाच्या ३८ खासदारांनीही विरोधात मतदान केले. (#America news update)

अमेरिकेला आपला खर्च भागविण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी कर्जातून उभा केला जातो, त्यासाठी संसदेत विधेयक मंजूर केले जाते. यावेळी ट्रम्प यांच्या पाठिंब्याने प्रस्तावित विधेयक मांडण्यात आले, मात्र ते मंजूर होऊ शकले नाही. याचा अर्थ अमेरिकन सरकारला आपल्या खर्चासाठी आवश्यक निधी मिळू शकणार नाही. या निधीतून सरकारी कर्मचा-यांचे वेतन आणि इतर प्रशासकीय खर्च सरकार भागवते. विधेयक मंजूर झाले नाही तर सरकारी कामकाज ठप्प होईल आणि shutdown ची परिस्थिती निर्माण होईल. (#America on track shutdown)
या विधेयकात मार्चपर्यंत सरकारी खर्चासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता. याशिवाय, आपत्ती निवारणासाठी १०० अब्ज डॉलर देण्याची आणि कर्जाची मर्यादा दोन वर्षांसाठी वाढविण्याची योजना होती. मागच्या वेळी जेव्हा असेच विधेयक मांडले होते तेव्हा ट्रम्प आणि इलॉन मस्क (Elon Musk) यांनी त्याला विरोध केला होता. (Latest News)
२० लाख कर्मचारी रजेवर जातील
#shutdown झाल्यास सुमारे २० लाख सरकारी कर्मचा-यांना पगार मिळणार नाही. त्यांना रजेवर पाठवले जाईल. यामुळे अनेक सरकारी संस्था तात्पुरत्या बंद कराव्या लागतील. विमान वाहतुक देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवा तसेच कायदा आणि सुरक्षा संबंधित कर्मचारीच काम करतील. याचा थेट परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्था आणि प्रशासनावर होणार आहे.