khabarbat

Russia has claimed to have found a cure for cancer. It has also claimed to provide this vaccine free of cost to all patients around the world.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Cancer | कर्करोगास छुमंतर करणा-या लस निर्मितीत यश!

 

मॉस्को : वृत्तसंस्था
कर्करोगावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. जगभरातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देण्याचा दावा देखील केला आहे. या नवीन संशोधनामुळे कर्करोग पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जगात कर्करोगाचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरणारे आहे.

जगभरात हे औषध लवकरच पोहचवण्यात येणार आहे. या औषधाचे अर्थात लसचे नाव काय अथवा त्याचा वापर कसा करणार याविषयीची माहिती अद्याप रशियाने दिली नाही. पण ही लस शरिरातील कर्करोगाचा प्रभाव निष्प्रभ करते आणि त्याचा फैलाव होऊ देत नाही असे समोर येत आहे.

ही लस २०२५ च्या सुरुवातीलाच बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कर्करोगग्रस्तांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली. ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल.

जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कर्करोग ही मोठी समस्या आहे. कर्करोगाचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. २०२२ मध्ये ६,३५,००० हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »