khabarbat

Team India, led by Nikki Prasad, defeated arch-rivals Pakistan. India won the match by 9 wickets.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

U 19 Asia Cup Women Match | टीम इंडियाकडून पाकिस्तानचा ९ विकेट्सने धुव्वा

नवी दिल्ली : अंडर १९ वूमन्स आशिया कप २०२४ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने निकी प्रसाद हिच्या नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडविला. भारताने हा सामना ९ विकेट्सने जिंकला. टीम इंडियाला विजयासाठी मिळालेले ६८ धावांचे माफक आव्हान हे ७.५ ओव्हरमध्ये पूर्ण केले.

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. दुस-याच बॉलवर पहिली विकेट गमावली; जी त्रिशा शून्यावर बाद झाली. मात्र त्यानंतर कामिलीनी आणि सानिका चाळके या जोडीने ६७ धावांची नाबाद भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियासाठी जी कामिलीनी हीने सर्वाधिक धावा केल्या. कामिलीने २९ चेंडूमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ४४ धावा केल्या. तर सानिका चाळके हीने ३ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूत नाबाद १९ धावा केल्या.

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा ९ विकेट्सने धुव्वा
टीम इंडियाकडून पाकिस्तानचा ९ विकेट्सने धुव्वा

भारतीय महिला संघ : निकी प्रसाद (कर्णधार), सानिका चाळके, जी. त्रिशा, जी. कामिलिनी (यष्टी रक्षक), भाविका अहिरे, मिथीला व्ही., जोशिथा व्हीजे, सोनम यादव, पारुनिका सिसोदीया, आयुषी शुक्ला आणि शबनम एमडी शकील.

पाकिस्तानी महिला संघ : झूफीशान अय्याझ (कर्णधार), कोमल खान (यष्टीरक्षक), फिझा फैझ, कुर्रतुलैन, महम अनीस, फातीमा खान, रोझीना अक्रम, रावली फरहान, माहेनूर झेब, आरीशा अन्सारी आणि आलिसा मुख्तीयार,

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »