khabarbat News Network

नवी दिल्ली : मारुती सुझुकी, ुंदाईसह अनेक ऑटो कंपन्यांनी १ जानेवारीपासून प्रवासी वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. याचसोबत आता टाटा मोटर्सकडून कार खरेदी करणे देखील नव वर्षापासून महाग होणार आहे. १ जानेवारी २०२५ पासून प्रवासी वाहनांच्या किमती ३ टक्क्यांपर्यंत वाढवणार असल्याची माहिती कंपनीने जाहीर केली. एकीकडे कर्जाचे व्याजदर वाढत आहेत, अशा परिस्थितीत आता कार घेणे सामान्यांसाठी अजून कठीण होणार आहे.
महत्त्वाची बातमी : १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी
कच्च्या मालाच्या किमती आणि महागाई वाढीचा परिणाम अंशत: कमी करण्यासाठी वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मॉडेल आणि त्यांच्या प्रकारांवर किमतीत बदल होणार आहेत. याआधी, मारुती सुझुकी, Hyundai, महिंद्रा अँड महिंद्रा आणि जेएसडब्ल्यू, MG सह अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनीही पुढील महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी, लक्झरी वाहन उत्पादक मर्सिडीज-बेंझ इंडिया, ऑडी आणि बीएमडब्ल्यू यांनी देखील खर्च आणि ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याचे कारण देत जानेवारीपासून किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.