khabarbat

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Indian Billionaires | अब्जाधिशांच्या यादीत भारत जगात तिसरा!

After America and China, India has 185 billionaires. India has got ranks third in the world in terms of the number of billionaires.

khabarbat News Network

नवी दिल्ली : भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत एका वर्षात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली. अमेरिका आणि चीननंतर भारतात १८५ अब्जाधीशांची संख्या झाली आहे. अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

एकीकडे भारतात रोजगाराचे संकट आहे आणि डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने कमकुवत होत आहे. महागाईमुळे लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. मात्र, दुस-या बाजुला अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे.

रेटिंग एजन्सी UBS च्या नवीनतम अब्जाधीश महत्वाकांक्षा अहवालात असे दिसून आले आहे की एका वर्षात भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीत ४२.१ टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेत अब्जाधीशांची संख्या ८३५ तर चीनमध्ये ४२७ आहे. एवढेच नाही तर भारतात दर तीन महिन्यांनी एक नवा अब्जाधीश होत आहे. भारतात एका वर्षात ३२ नवीन अब्जाधीशांची भर पडली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »