khabarbat

Dearness allowance is estimated to be 55.91%. In such a situation, it seems that central employees will once again have to be content with only 3 percent. Therefore, the expectations of central employees for dearness allowance in the new year may be hit.

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

पेन्शनधारक, केंद्रीय कर्मचा-यांच्या ‘डीए’मध्ये जानेवारीत घट!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जानेवारी २०२५ मध्ये केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का बसू शकतो. महागाई भत्त्यात आजपर्यंतची सर्वात कमी म्हणजेच सुमारे ३ टक्के वाढ दिसण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्यात यावेळी गेल्या तीन वर्षांच्या काळातली सर्वात कमी वाढ ठरू शकते.

Dearness allowance is estimated to be 55.91%. In such a situation, it seems that central employees will once again have to be content with only 3 percent. Therefore, the expectations of central employees for dearness allowance in the new year may be hit.

केंद्रीय निवृत्ती वेतनधारकांसमोरील आव्हाने ओळखून ८० आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन देण्यात येते. लेबर ब्यूरोनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२४ पर्यंतचा महागाई भत्ता ५४.४९ टक्के झाला आहे.

महागाई भत्त्याचा नवा कल
सध्याचा कल पाहता ऑक्टोबरचा डीए निर्देशांक १४३.६ पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता ५४.९६ टक्क्यांवर पोहोचेल. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीत सहाव्या आणि ७ व्या वेतन आयोगात कर्मचा-यांना वाढ मिळाली होती.

३ टक्क्यांवर मानावे लागणार समाधान
डिसेंबर २०२४ पर्यंत, निर्देशांकात १४४.६ अंकांचा कल दिसतो आहे. अशा परिस्थितीत, महागाई भत्ता ५५.९१% राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय कर्मचा-यांना पुन्हा एकदा केवळ ३ टक्क्यांवरच समाधान मानावे लागणार असे दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्षात केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यांच्या अपेक्षेला धक्का बसू शकतो.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »