khabarbat

शेअर बाजार उसळला; गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा

Advertisement

  • Advertise with khabarbat.com

Share Market News | गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा; निवडणुकीनंतर शेअर बाजार उसळला

 

मुंबई : विशेष प्रतिनिधी
गेल्या दीड महिन्यापासून अस्थिर असणा-या शेअर बाजारात आज (सोमवारी) महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विजयानंतर चांगलीच उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारला आहे. आज सकाळी, २ दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीनंतर, सेन्सेक्स ८०,४०० च्या वर व्यवहार करत आहे, तर निफ्टी २४,३०० च्या वर व्यवहार करत आहे. दोन्हीमध्ये १.५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसत आहे.

भाजपच्या विजयाचा परिणाम
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले, ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ पैकी २३३ जागा जिंकल्या, तर माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी झारखंडमध्ये सत्तेवर परत आली आहे.

गुंतवणूकदारांना ९ लाख कोटींचा नफा
याआधी शुक्रवारीही शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली. गेल्या २ व्यापार सत्रांमध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली. सोमवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड सर्व कंपन्यांच्या बाजार भांडवलात ८.६६ लाख रुपयांची वाढ नोंदवली गेली, त्यानंतर ती ४४१.३७ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

अदानींच्या शेअर्समध्ये तेजी
नुकतेच, लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अमेरिकेच्या अभियोगाने उद्योगपती गौतम अदानी विरुद्ध तपास आणि अटक वॉरंट जारी जारी केलं. त्यानंतर अदानी शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवली गेली होती. मात्र, शुक्रवारी अदानी समूहातील शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळाली. सोमवारी देखील अदानी शेअर्समध्ये ७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. गेल्या २ व्यापार दिवसांमध्ये, अदानी समूहाच्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये २८ बिलियन डॉलरपेक्षा जास्त घसरण झाली होती.

हेवीवेट स्टॉक्समध्ये वाढ
सोमवारी हेवीवेट शेअर्सच्या वाढीमुळे बाजार १,२०० हून अधिक अंकांनी वाढला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी आणि एसबीआयने सेन्सेक्सच्या वाढीमध्ये ७०० हून अधिक पॉइंट्सचे योगदान दिले. या शेअर्समध्ये २% ते ३.५% वाढ झाली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »