मुंबई : khabarbat News Network
भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी (BJP survey) सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. (Marathi News)
या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा जिंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला २५ ते ३० जागा मिळतील. या निवडणुकीत बहुमत आम्हाला मिळेल. महायुतीला १६५ पर्यंत जागा मिळतील, असा दावा विनोद तावडे यांनी केला. ( Latest News)
हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात १० वर्ष काम केले होते. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला.