नांदेड । प्रतिनिधी
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचे घरी जाऊन टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा उत्साही प्रतिसाद या मतदान प्रक्रियेला मिळत आहे.
या प्रक्रियेचा भाग म्हणून, नांदेड येथील स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील दिव्यांग कु. अस्मिता बापूराव दासरी, हिच्या घरी जाऊन मतदान अधिका-यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे तिचे मतदान करून घेतले. याप्रसंगी बूथ लेवल ऑफिसर सारंग व इतर कर्मचारी उपस्थित होते. अत्यंत उत्साहात तिने हे मतदान केले असून दिव्यांग मतदार ज्या उत्साहात मतदान करीत आहेत, त्याचा आदर्श इतर मतदारांनी घेणे आवश्यक आहे व नांदेड लोकसभा व जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी या बाबीकडे विशेष लक्ष देऊन शंभर टक्के मतदान करणे आवश्यक आहे असे अस्मिताचे वडील बापू दासरी यांनी सांगितले.