मुंबई : khabarbat News Network
विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार चर्चा सुरु होती. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीनेही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ जास्त असेल त्याचाच मुख्यमंत्री होईल असे दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलं आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा संकेत दिला. ‘कॉम्प्रोमाईज करणारा माणूस पुढे यशस्वी होतो’, असं सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून अजित पवार हे तूर्त तरी बाहेर पडल्याचे दिसत आहे. मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांनी नरमाईचे संकेत दिले आहेत. दोन पावलं मागे पुढे घेऊन कॉम्प्रोमाईज करावं लागतं असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा विषय आपल्यासाठी गौण असल्याचेही अजित पवार म्हणाले.
हे देखील वाचा… स्वत:चा घाम विका, करोडपती बना…
कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्यावेळी काम करता तेव्हा दोन पावलं पुढे-मागे सरकावंच लागतं. कॉम्प्रोमाईज करावं लागतं. जो कॉम्प्रोमाईज करतो तोच माणूस पुढे यशस्वी होतो. त्यामुळे आता तो मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. आमच्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीचे सरकार निवडून द्यावं हा आमचा मुख्य अजेंडा आहे, असं अजित पवार म्हणाले.