khabarbat

suhas kande against sameer bhujabal tough fight in Nandgaon constituency.

Advertisement

आमदार कांदे विरूद्ध पत्रकार कांदेने दंड थोपटले!

khabarbat News Network
कळंब (जि. धाराशिव) : येथील ग्रामीण पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सुहास कांदे यांचा शोध घेऊन राष्ट्रवादी (अजीत पवार गट) चे नेते छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी पोलीस बंदोबस्तात त्यांचा उमेदवारी अर्ज नांदगाव मतदार संघात दाखल करण्यात केल्यामुळे कळंबचे सुहास कांदे एका रात्रीत राज्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. नांदगाव विधानसभेची लढत हाय व्होल्टेज होत आहे. येथे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ते विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात उभे आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा राजीनामा देऊन विद्यमान आ. सुहास कांदे यांच्या विरोधात दंड थोपटले. राज्यात सुहास कांदे नावाचा दुसरा कोणी व्यक्ती भेटतो का याचा शोध भुजबळ घेत होते, त्यावेळी कळंब तालुक्यातील सापनाई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्ते असलेले सुहास कांदे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला. कळंब येथील सुहास कांदे हे नेहरू युवा केंद्रामध्ये होते. युवक मंडळाच्या माध्यमातून ते सामाजिक कामात सहभागी असतात.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »