khabarbat

Advertisement

Mahim election | माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडणार?

 

मुंबई : khabarbat News Network

माहीम या विधानसभा मतदारसंघातील विजयाचा हलवा पटकाविण्यासाठी ‘राज’पुत्र अर्थातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, विद्यमान शिवसेना आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे सेनेचे महेश सावंत हे तिघे सरसावले आहेत. या कठीण कसोटीत माहीमचा हलवा अमित ठाकरेंच्या पचनी पडेल का? याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Amit Thackeray, the son of MNS President Raj Thackeray, the current Shiv Sena MLA Sada Saravankar and Mahesh Sawant of the Thackeray Sena have joined forces to win the Mahim Assembly Constituency. Will Mahim’s move be acceptable to Amit Thackeray in this tough test? Maharashtra has drawn attention to this.

उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (मंगळवार, २९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांनी त्यांची भूमिका जाहीर केली. ते मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज भरताना सामना शाखेपासून भव्य रॅली काढत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे स्वत: सदा सरवणकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडूनच परवानगी मिळाली असल्याची महत्त्वाची माहिती सरवणकर यांनी दिली.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »