मुंबई : विशेष प्रतिनिधी
यंदा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातून उमेदवारांची यादी घोषित केली जात आहे. राज्यात एकूण २८८ मतदारसंघ आहेत. यात आतापर्यंत विविध मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीने २८८ पैकी २३९ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात काँग्रेसने ८७, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून ८५ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ६७ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महायुतीकडून २१५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात भाजपने सर्वाधिक १२१ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून ४९ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महाविकास आघाडी
काँग्रेस – ८७, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ८५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ६७, एकूण जाहीर जागा : २३९ बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत) : ४९ एकूण जागा: २८८
महायुती
भारतीय जनता पार्टी : १२१, शिवसेना (शिंदे गट): ४५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ४९, एकूण जाहीर जागा : २१५, बाकी जागा (ज्यांवर उमेदवार जाहीर करायचे आहेत) : ७३, एकूण जागा: २८८