khabarbat News Network
मुंबई : भाजपच्या एक घर, एक तिकीट धोरणाने अनेकांचा पत्ता कट होण्याची चर्चा रंगत आहे. दुसरीकडे कोकणात काही ठिकाणी चिन्हांची अदलाबदल करुन महायुती निवडणुकांना सामोरं जाण्याची तयारी करीत आहे.
अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीचे आमदार आहेत. यंदाही भाजपकडून तेच उमेदवार असतील. पण त्यांचे पुत्र सुजय विखे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांविरोधात संगमनेरमधून तयारी करत होते. तिकीटासाठी विखेंनी भाजपकडे प्रस्तावही ठेवला. मात्र ‘एक घर, एक तिकीट’ धोरणामुळे भाजपने सुजय विखेंना तिकीट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संगमनेर लोकसभेत थोरात विरुद्ध विखे लढत रंगण्याची चिन्हं मावळली आहेत.
The BJP’s one house, one ticket policy is being discussed to cut the addresses of many people. On the other hand, Mahayuti is preparing to face the elections by exchanging symbols in some places in Konkan.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ३ विधानसभा मतदारसंघांपैकी २ ठिकाणी चिन्हांची अदलाबदल करुन उमेदवारीची चर्चा आहे. भाजपचे नितेश राणे आधीपासूनच कणकवलीमधून आमदार आहेत, त्यात यंदा निलेश राणेंनाही तिकीट दिल्यावर भाजपच्या एक घर, एक तिकीट धोरणाला धक्का लागू शकतो. त्यामुळे निलेश राणेंना कुडाळमधून श्ािंदेंची शिवसेना अर्थात धनुष्यबाणावर लढवलं जाण्याची शक्यता आहे. तर सावंतवाडीतून शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर धनुष्याऐवजी कमळ हाती घेवून लढण्याची चिन्हे आहेत.