khabarbat

After Radhakrishna Vikhe Patil now Suresh Dhas met Manoj Jarange. It was reported that this meeting took place at midnight.

Advertisement

BJP leaders meet Manoj Jarange | अंतरवालीत रंगतात मध्यरात्री ‘पॉलिट्रिक्स’

khabarbat News Network
अंतरवाली (सराटी) : विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा विषय गेम चेंजर ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. ओबीसी, धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच भाजप नेत्यांच्या अंतरवाली सराटीत ये-जा आणि ऊठ-बस वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होताच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते आणि इच्छुकांची रांग लागली आहे. सरकारमधील मंत्री मध्यरात्री भेटी घेत असल्याने या भेटीमागील गूढ काय, याची उत्सुकता सा-यांनाच लागून आहे.

After Radhakrishna Vikhe Patil now Suresh Dhas met Manoj Jarange. It was reported that this meeting took place at midnight. However, what was discussed in this meeting has not come out yet.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. यानंतर आता सुरेश धस यांनी अंतरावली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मध्यरात्री १ वाजता ही भेट झाल्याची माहिती मिळाली.या भेटीत काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आले नाही. परंतु, एकामागून एक भाजप नेते अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »