khabarbat

The first plane landed at Navi Mumbai Airport

Advertisement

नवी मुंबई विमातनळावर उतरले पहिले विमान!

The first plane landed at Navi Mumbai Airport
The first plane landed at Navi Mumbai Airport

नवी मुंबई : khabarbat News Network
The first plane landed at Navi Mumbai Airport | सिडको आणि महायुती सरकारसाठी महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अखेर पहिले विमान उतरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख अधिकारी या धावपट्टी चाचणीवेळी उपस्थित होते.

२०२५ मध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कामाला वेग आला असून, पूर्ण झालेल्या पहिल्या धावपट्टीवर भारतीय वायू दलाचे सी-२९५ हे विमान उतरवण्यात आले.

धावपट्टीवर उतरण्यापूर्वी सी-२९५ विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर विमान यशस्वीपणे नवी मुंबई विमानतळावरील धावपट्टीवर उतरवण्यात आले. विमान यशस्वीपणे उतरल्यानंतर वॉटर सॅल्यूट करण्यात आला.

हवाई दलाचे सी-२९५ विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानात जाऊन वैमानिकांचे अभिनंदन केले. तसेच धावपट्टीची पाहणी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकाचवेळी ३५० विमाने उभी केली जाऊ शकणार आहेत. या विमानतळापर्यंत जाण्यासाठी मेट्रो असणार आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »