khabarbat

Wild life experts have sighting of a lowland bird like the peacock at a height of 6,500 feet in Uttarakhand.

Advertisement

मोराने घेतली चक्क ६,५०० फुटांवर भरारी!

डेहराडून । khabarbat News Network
हिमालयातील मानवी हस्तक्षेप वाढल्याने याचा पर्यावरणावर देखील प्रतिकूल परिणाम होऊ लागला असून येथील जैवविविधता आता धोक्यात आली आहे. एरव्ही जमिनीवर आणि छोट्या झाडांवर राहणारा मोरासारख्या पक्षाने उत्तराखंडमध्ये ६,५०० फूट उंचीवर भरारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Increasing human interference in the Himalayas has also started to adversely affect the environment and its biodiversity is now under threat. A peacock-like bird that lives on the ground and in small trees is surprising as it soared at an altitude of 6,500 feet in Uttarakhand.

डेहराडून जिल्ह्यातील जंगलामध्ये दोनदा ठराविक उंचीवर हा पक्षी आढळला. एप्रिल महिन्यात तो काफलीगेर वनक्षेत्रात आढळला होता. तो ५ ऑक्टोबर रोजी काथ्यातबारा जंगल परिसरामध्येही आढळल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

मोराच्या वर्तनात झालेला हा बदल खरोखरच आश्चर्यजनक म्हणावा लागेल. हा पक्षी साधारणपणे समुद्रसपाटीपासून १,५०० फूट उंचीवर राहणे पसंत करतो. मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे वेगाने स्थलांतर होते आहे, तसेच त्यांच्या नैसर्गिक वर्तनात देखील बदल होत असल्याचे बागेश्वर वन विभागाचे अधिकारी ध्यानसिंह करायत यांनी सांगितले. या भागातील मोरांच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाने काही कॅमेरे देखील लावले होते.

 

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »