khabarbat

Advertisement

टोयोटा-किर्लोस्करच्या प्रकल्पाला संभाजीनगरात ८२७ एकर जमीन

– २१ हजार कोटींची गुंतवणूक

– जानेवारी २०२६ पासून उत्पादन सुरू होणार

– ८००० प्रत्यक्ष तर अप्रत्यक्ष १० हजार रोजगार

– दरवर्षी ४ लाख हायब्रिड, इलेक्ट्रीक कारचे उत्पादन

संभाजीनगर : विशेष प्रतिनिधी

चारचाकी वाहन निर्मितीत जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स कंपनीने सोमवारी (दि.७) बिडकीन ‘डीएमआयसी’मध्ये २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या मागणीनुसार सोमवारी AURIC City ने कंपनीला ८२७ एकर जमीनीचे अलॉटमेंट लेटर पाठविले.

हे पण वाचा : दिवाळीपूर्वी जीवनावश्यक वस्तू, औषधे स्वस्त होणार!

टोयोटा-किर्लोस्कर मोटर्स यांना छत्रपती संभाजीनगर येथे नवीन उत्पादन प्रकल्पासाठी ८२७ एकर जमीन मंजूर करण्यात आली. ‘टीकेएम’ने ३१ जुलै रोजी राज्य सरकारसोबत करार केला होता. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (DMIC) च्या अधिका-यांनी सांगितले की, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त भागीदारीतून एक ग्रीनफिल्ड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी स्थापन करण्यात आली आहे, जी विशेष उद्देश वाहन (SPV) महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिप लिमिटेड (MITL) मार्फत विकसित होत आहे. शेंद्रा आणि बिडकीन या नोड्स विकसित होत आहेत.

टीकेएम’ कंपनी या प्रकल्पासाठी २१ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामधून जानेवारी २०२६ पासून उत्पादन अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रात ८ हजार थेट आणि १८ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी ४ लाख इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कारचे उत्पादन होईल.

Toyota-Kirloskar Motors investing 21 thousand crore rupees in Bidkin ‘DMIC’. As per the demand of the company, AURIC City sent the allotment letter of 827 acres of land to the company on Monday, 7th Oct 2024.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »