khabarbat

Hydrogen powered trains will soon run in India. The hydrogen train can be tested in the month of December itself. With this, India will join the ranks of Germany, France, Sweden and China.

Advertisement

Hydrogen Railway | भारतात लवकरच हायड्रोजन रेल्वे धावणार

 

नवी दिल्ली : khabarbat News Network
भारतात लवकरच हायड्रोजन संचालित रेल्वे धावणार आहे. डिसेंबर महिन्यातच हायड्रोजन रेल्वेचे परीक्षण होऊ शकते. यामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीनच्या श्रेणीत सामील होणार आहे. भारतीय रेल्वे प्रथम ३५ रेल्वेगाड्यांचे संचालन करणार आहे. एका रेल्वेगाडीकरता ८० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर याचे ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यास देखील ७० कोटी रुपये खर्च होणार आहेत.

पहिली हायड्रोजन रेल्वे जींद-सोनीपत मार्गावर धावू शकते. हरियाणात रेल्वेसाठी हायड्रोजन १ मेगावॅट पॉलीमर इलेक्ट्रोलाइट मेंब्रेन इलेक्ट्रोलाइजरकडून प्राप्त होईल, जे जींदमध्ये स्थापित असेल. तेथे प्रतिदिन सुमारे ४३० किलोग्रॅम हायड्रोजन तयार केला जाणार आहे. तेथे ३ हजार किलोग्रॅम हायड्रोजन स्टोरेजची देखील क्षमता असणार आहे.

यात इंजिनच्या जागी हायड्रोजन फ्यूल सेल्स लावले जातात. यामुळे प्रदूषण होणार नाही. अशाप्रकारच्या रेल्वेला हायड्रेल देखील म्हटले जाते. या रेल्वेत चार डबे असू शकतात. या रेल्वेला नीलगिरी माउंटेन रेल्वे, दार्जिलिंग हिमालयन, कालका शिमला रेल्वे, कांगडा खोरे आणि बिलमोरा वाघई आणि मारवाड देवगढ मदारिया मार्गावर चालविण्याचे नियोजन आहे. कपुरथळा आणि इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत ही रेल्वे तयार केली जात आहे.

तुझे मत
माझी साइट कशी आहे?
  • Add your answer

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

You May Also Like

Translate »